Skip to main content

Meri life ki kahani

मी एक वैदयकिय प्रतिनिधी(medical representative ) सामान्य लोक मला औषध विकणारा एजन्ट समजतात पण खार तर त्यांना वैद्यकीय प्रतिनिधी चा खरा अर्थ माहित नाही,वैद्यकीय प्रतिनिधी ची नोकरी करताना मला खूप वेगळे वेगळे अनुभव आले. आज मला या नोकरी मध्ये ९ वर्ष पूर्ण झाले . मला आठवते माझा नोकरी चा पहिला दिवस होता आणि माझे सिनियर मला डॉक्टर कडे घेऊन गेले आणि माझी ट्रैनिंग सुरु झाली. पहिल्यांदा मला वाटलं हि कशी नोकरी आहे आपल्याला ओळी मध्ये उभे राहून नंबर लावावा लागतो डॉक्टरांना भेटण्याकरिता आणि तासन तास बसावे लागते. पण माझ्याकडे दुसरा पर्यायाय नव्हता कारण जबाबदारी ची जाणीव. तर असा माझा वैद्यकीय प्रतिनिधी चा प्रवास सुरु झाला तो दिवस होता ७ जुलै २०१० ला. आता वैद्यकीय प्रतिनिधी म्हटलं तर दुचाकी गाडी असणे खूप महत्वाचे आणि माझ्याकडे काहीच पैसे नव्हते तर गाडी कशी घेणार बिना गाडीचे रिक्षांचे  काम सुरु होते . माझे जे वरिष्ठ अधिकारी होते ते खूप समजदार होते त्यांनी माझी परिस्थिती समजून घेतली आणि बिना गाडीचे नोकरी करण्यास संधी दिली आणि २, ३ महिन्यामध्ये गाडी घेऊन घे असे सांगितले. कसातरी पहिला दिवस संपला डॉक्टर ला भेटण्याचे जे रोजचे काम असते ते झाले आणि पहिल्या दिवशी आम्ही १० डप्क्टर ला भेटलो. जाताना माझ्या अधिकारी साहबांनी मला सांगितले उद्या सकाळी ४ वाजता एका डॉक्टर ची अपॉइंटमेंट घ्याल जावे लागते तुला जमले तर जा. मी बोललो बघतो सर आणि घरी म्हणजे मित्राच्या रूमवर जाण्यासाठी निघालो. डोक्यात एकाच विचार सुरु होता तो म्हणजे उद्या सकाळी ४ वाजता डॉक्टर ची अपॉइंटमेंट घेण्यास कसे जावे अँलूंकडे कोणते वाहन नाही आणि अपण  ५ ते ६ कि मी दूर राहतो असा विचार करत मी रूमवर गेलो. 
डोकयात एकच विचार सकाळी अपॉइंटमेंट कशी घायची आणि झोप पण लागत नव्हती कशीतरी अर्धवट झोप लागली आणि रात्रीच्या २:३० मी नि जाग आला तसेच कपडे घातले गाडी नव्हती ना सायकल निघालो ना पायी ५ कि मी पायी चालल्यानंतर दवाखान्यात पोहचलो तर माझा दुसरा नंबर लागला. विचार करा रात्रीच्या २:३० वाजता रोडवर मी एकटाच चारीही कडे घोर अंधार आणि सगळी खाद्य हूर हूर आवाज अनु मी चालत आहे डोक्यात एकाच विचार अपॉइंटमेंट लागली पाहिजे आणि सेवटीं लागली. मित्रानो वैद्यकीय प्रतिनिधी म्हटले किं खूप फिरावे लागते हाच कन्सेप्ट लोकांच्या दोज्यात आहे पण हा एक सुंदर आणि मजेदार जॉब आहे . जीवनात खूप काही अनुभव येतात रोज नवीन लोक मिळतायत आणि एकमेकांचे विचारची देवाण घेवाण होते. एके डॉक्टर कडून दुसऱ्या डॉक्टर कडे, दुसऱ्या कडून तिसऱ्या कडे बस हाच एकाच काम. त्यामध्ये फक्त एकाच खंत आहे कि ४ तास थांबल्यानंतर डॉक्टरांची भेट हो ते आणि दर फक्त १ मी देतात बोलायला आणि आपली गोस्ट पाठवून सांगायला. सेल्स आणि मार्केटिंग म्हटलं कि सगळ्यांची हीच परिस्थिती असते. तसे हा डॉक्टर पेक्षा महत्वाचे म्हणजे बाहेर काउंटर बसलेली व्यक्ती त्याला हॅन्डल करणे म्हणजे खूप
कटींन काम तो डॉक्टर पेक्षाही खूप इगोस्टीक आणि ऍरोगंट असतो बोलायला. आणि एका वैद्यकीय प्रतिनिधीला सगळ्यांना हसत मुखानेच बोलावे लागते. वैद्यकीय प्रतिनिधी नोकरी चा महत्वहाचा घटक म्हणजे टार्गेट आणि क्लोजिंग.


Comments